___ मुंबई - महाराष्ट्र लोकसेवा आयोगासाठी दक्षिण मुंबईत किंवा मुंबईत इतरत्र जागा उपलब्ध व्हावी यासाठी जागा नि?चित करण्यासाठी अप्पर मुख्य सचिव सेवा यांच्या एकसदस्यीय समितीची घोषणा मुख्यमंत्यांनी केली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्थापनेपासून आयोगाच्या कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत नसल्याचा तारांकित प्रश्न. निरंजन डावखरे यांनी विधान परिषदेत विचारला होता. या प्रश्नाला मुख्यमंत्यांनी उत्तर देताना एमपीएससीसाठी दक्षिण मुंबईत जागा असण्याची आवश्यकता व्यक्त केली. या इमारतीसाठी १ लाख चौरस फट इतक्या जागेची गरज आहे. यासाठी अनेक पर्यायांचा विचार केला जात आहे. मात्र दक्षिण मंबईत जागा असावी असा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. सेल्स टॅक्सची इमारत किवा एअर इंडियाच्या इमारतीचा काही रिकामा भागही यासाठी मिळवता येईल. मात्र, दक्षिण मुंबईत एमपीएससीचे कार्यालय असेल तर विद्यार्थ्यांसाठी आणि अधिकाक्षऱ्यांसाठीही ते सोयीचे होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले. एमपीएससीच्या नवीन इमारतीत प्रशस्त ग्रंथालय आणि हॉस्टेल देखील असावे, अशी सूचना सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी केली.
एमपाएससा च्या जागा नाश्चतासाठा सामतI