महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची संख्या ४७ ने वाढली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात आता ५३७ करोनाग्रस्त आहेत. महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. या ४७ रुग्णांपैकी ४३ रुग्ण मुंबई आणि ठाण्यातले आहेत. त्यामुळे चिंता आणखी वाढली आहे. २८ पॉझिटिव्ह रुग्ण मुंबईत तर १५ पॉझिटिव्ह रुग्ण ठाण्यात सापडले आहेत. अमरावतीत १ रुग्ण, २ पुण्यात, तर पिंपरीत १ रुग्ण सापडला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातली रुग्णसंख्या ५३७ वर गेली आहे. शुक्रवारी रात्रीपर्यंत ही संख्या ४९० होती. आता ही संख्या ५३७ झाली आहे.
टेन्शन कायम! ४७ नवे करोना पॉझिटिव्ह, महाराष्ट्रातली रुग्णसंख्या ५३७